tek marathi

baliraja

शुक्रवार, 1 मई 2015

 वसंत ऋतू --आल्हाददायक वारे जेव्हां   सुखवि ती मना  
गुढी उभारून  नवव र्षाचे स्वागत करू या वाटे  जना  
कोकीळ  अपुल्या मंजुळ स्वरे बोलावितो तिला ,
तेव्हां समजावे धरणीवरती वसंत ऋतू अवतरला .
विचार करणे ठाउक नसते आम्हासारखे पक्ष्यांना  
परी जाणीव कोठेतरी अंतरी सांगत असते त्यांना  
हीच वेळ खरी समागमाची नातर होईल काय  
अंडी घालण्या उशीर होईल,घरटे उसने मिळेल काय?  
मिळेल तरी ते असेल काउचे,पाउस पडता वहाणार    
उघडयावर  पडता पिले आपुली माउतोंडी जाणार
हा दूरचा विचार जरी का आपणास ना सुचणार  
निसर्ग देतो जरी न बुध्दी ,नेणीव पक्ष्या रुपणार